…तर त्याचा वेग आणखीन वाढेल

नीरज चोप्राने बुमराहला दिला सल्ला

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

जसप्रीत बुमराहची गणना जगातील महान वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याच्याकडे ताशी 140 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्याचा गोलंदाजीचा वेग आणखीन वाढवण्यासाठी त्याने रनअप वाढविणे गरजेचे आहे, असा सल्ला भालाफेकपटू नीरज चोप्राने दिला आहे.

नीरजने त्याचा आवडता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला अधिक वेग कसा वाढवता येईल याचा सल्ला दिला आहे. चोप्राला वाटते की एक छोटासा बदल त्याचा आवडता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा वेग वाढवण्यास मदत करेल. तो एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत बोलत होते. तो म्हणाला, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी करण्याची शैली आवडते. मला वाटतं त्याचा वेग आणखी वाढवण्यासाठी त्याने रनअप वाढवले पाहिजे.

Exit mobile version