तळेगाव येथील भातशेतीचे नुकसान नाही; सरकारचा दावा

। मुंबई । प्रतिनिधी ।

काळ सिंचन प्रकल्पाच्या कुंडलिका डाव्या तीर कालव्यातील पाण्यामुळे तळेगाव येथील भातशेतीचे नुकसान झाले नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री देेवंद्र फडणवीस यांनी केला. याबाबतचा तारांकित प्रश्‍न शेकाप आ.जयंत पाटील यानी उपस्थित केला होता.

माणगाव शाखा कालव्याच्या कि.मी.18/835 येथील तळेगाव मायनर क्र. 10. द्वारा दरम्यान वाढीव कालावधीकरीता सिंचन पाणीपुरवठा करण्यात आला आहे. सिंचन हंगाम सन 2021-22 मध्ये मौजे तळेगाव मायनर नं. 10 ला पाणीपुरवठा सुरळित झालेला असून, तळेगाव येथील भातशेतीचे नुकसान झाले नसल्याचे फडणवीस यांनी लेखी उत्तरात सांगितले.

मूळ प्रश्‍नात जयंत पाटील यांनी माणगाव तालुक्यामध्ये तळेगाव येथील भातशेतीला माहे एप्रिल व मे 2022 मध्ये कालव्याचे पाणी मिळाले नसल्याने शेकडो एकर शेती धोक्यात आली असून भात पीक सुकल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आणले होते. याबाबत शेतकर्‍यांनी अनेकवेळा माणगाव येथील पाटबंधारे प्रकल्प अधिकार्‍यांना भेटून कालव्याला पाणी सोडले नसल्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. कालव्याला पाणी न सोडणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करुन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कोणती उपाययोजना केली अशी विचारणाही केली होती.

Exit mobile version