पेट्रोल पंपावर पेट्रोलच नाही

| आगरदांडा | प्रतिनिधी |

आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेल्या पुरवठा साखळीतील अडचणींची झळ अजूनही सर्वसामान्य वाहन चालकांना बसत आहे. मुरुड तालुक्यातील शिघ्रे पेट्रोल पंपावर सोमवारी (दि.8) सायंकाळच्या सुमारास ‘पेट्रोल संपला आहे’ अशी पाटी लावण्यात आली होती. मंगळवारी (दि.9) देखील पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्याने वाहनचालकांना पेट्रोलसाठी एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पेट्रोल पंप मालक, संबंधित प्रशासन आणि तेल कंपन्यांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवून नियमित पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.

Exit mobile version