देवेंद्र फडणवीस यांची मागणी, देशमुख परिवाराचे सांत्वन
सांगोला | प्रतिनिधी |
भाई गणपतराव देशमुख यांच्या सारखी माणसं ही पक्षविरहीत आहेत.आबासाहेबांचे विधानमंडळातील अनेक भाषणे ऐकून आमच्यासारख्या अनेकांना महाराष्ट्राचे विविध प्रश्न समजले. आबासाहेबांची उंची व कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांनी विधानमंडळा सारख्या संस्थेची उंची वाढवली आहे, त्यांनी सर्वाधिक काळ महाराष्ट्राच्या विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे ,त्यामुळे अश्या महान, तत्त्वनिष्ठ व्यक्तीचे विधिमंडळाच्या परिसरात स्मारक उभा केले पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी आ. कै. गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मंगळवारी 17 ऑगस्ट रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबीयांची सांगोला येथे भेट घेतली. या भेटीवेळी गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव पोपटराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, आबासाहेबांचे नातू बाबासाहेब देशमुख यांच्यासह खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. प्रशांत परिचारक, आमदार विजयकुमार देशमुख, आ. गोपीचंद पडळकर, आ. समाधान आवताडे, आ. सचिन कल्ल्याणशेट्टी, आ. राम सातपुते, धैर्यशील मोहिते-पाटील, सांगोला भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, शशिकांत चव्हाण, माजी आमदार लक्ष्मण ढोबळे, आ. राहुल कुल, आ. जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्ल्याणशेट्टी, जि. प. स. अतुल पवार, नानासो लिगाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना विरोधीपक्ष नेते आ. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुष्काळी भागातील लोकांचे दुःख जाणारा नेता, सामान्यांसाठी सतत लढत असलेले व प्रश्न सोडणारे नेते म्हणूनच त्यांची ओळख होती. त्यांनी सर्वसामान्यांसाठी केलेले कार्य महान आहे. र्. गणपतराव देशमुख यांच्या कार्याची खूप मोठी परंपरा आहे. त्यांच्या कार्यात त्यांच्या कुटुंबीयांनीही साथ दिली आहे.असे ते म्ङणाले.
गणपतराव देशमुख यांच्यासारख्या तत्त्वनिष्ठ व्यक्तीचे विधानभवनाच्या आवारात स्मारक उभा केले पाहिजे. यासाठी आपण सरकारकडे स्मारक उभारणीसाठी विनंती करणार आहे. आबासाहेबांसारख्या पक्षविरहीत असलेल्या नेत्याला मतदान करताना मलापण आनंद झाला असता, देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते