ऐन गणेशोत्सवात कर्मचार्‍यांवर आली ‘ही’ वेळ

ठेकेदारांनी कामगारांचे पैसे थकविले; गणेशोत्सवापूर्वी पगार देण्याची मागणी

। उरण । वार्ताहर ।

उरण नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या 45 सफाई कामगारांना जुलै 2022 या महिन्याचा आजतागायत मिळालेला नाही. दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊनही पगार ठेकेदारांनी न मिळाल्याने सण कसा साजरा करायचा, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. तरी ठेकेदारांनी कंत्राटी कामगारांचा पगार गणेशोत्सवापूर्वी द्यावा, अशी मागणी मुख्याधिकारी संतोष माळी यांच्याकडे म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियने केली आहे.

सफाई कामांचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांनी त्यांच्याकडे कंत्राटी पद्धतीवर 45 कामगार काम करीत आहेत. त्या कामगारांचा जुलै 2022 चा पगार आज 28 ऑगस्ट उजाडूनही मिळालेला नाही. गणेशोत्सव जवळ येऊनही कंत्राटी सफाई कामगारांना ठेकेदारांनी तुटपुंजा पगार ही दिला नसल्याने गणेशोत्सव सण साजरा कसा करायचा, असा प्रश्‍न कामगारांना पडला आहे. तरी हातावर पोट असणार्‍या सफाई कामगारांची अडचण लक्षात घेत गणेशोत्सवापूर्वी ठेकेदारांनी कंत्राटी सफाई कामगारांना पगार देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी मुख्याधिकारी संतोष माळी यांच्याकडे म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केली आहे.

Exit mobile version