यंदा दहा दिवस आधीच बोर्डाची परीक्षा

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

| मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी, बारावीची परीक्षा दहा दिवस आगोदर घेतली जाणार आहे. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

इयत्ता दहावीचा पहिला पेपर मराठी, हिंदी व इतर प्रथम भाषा या विषयांचा राहील. दरम्यानच्या काळात वेळापत्रकानुसार कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी आदी शाखांची परीक्षा होणार आहेत. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीकॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्वच केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे व सरमिसळ पद्धत अवलंबली जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तात्पुरते परीक्षा वेळापत्रक जाहीर केल्यावर त्यावर राज्यभरातून हरकती मागविल्या होत्या. त्यासंदर्भात केवळ 40 हरकती प्राप्त झाल्या होत्या, त्याही किरकोळ स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे बोर्डाने नियोजित वेळापत्रक अंतिम केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावी प्रात्यक्षिक परीक्षा : 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी, लेखी परीक्षा : 11 फेब्रुवारी ते 18 मार्च. तर, इयत्ता दहावी प्रात्यक्षिक परीक्षा : 3 ते 20 फेब्रुवारीपर्यंत, लेखी परीक्षा : 21 फेब्रुवारी ते 17 मार्च रोजी होणार आहे.

Exit mobile version