मोदींना जीवे ठार मारण्याची धमकी

| नवी दिल्ली | वार्ताहर |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिलीय. त्याने समाजमाध्यमांवर हातात तलवार घेऊन एक व्हिडीओ शेअर केला आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार अशी धमकी त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यावर व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमधील सूरपूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मोहम्मद हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Exit mobile version