चोरढे येथे घरफोडी; पन्नास हजारांचा ऐवज लंपास

तिघांना अटक

। रेवदंडा । प्रतिनिधी ।

मुरुड तालुक्यातील चोरढे येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत सुमारे 50 हजार रुपये किमतीचा माल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरढे येथील फिर्यादी आनंद रोटकर यांच्या घरात सोमवार, दि.16 सकाळी 9 वाजल्यापासून ते बुधवार दि.25 नोव्हेंबर सकाळी 9 वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरी झाली. आरोपींनी बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि सुमारे 50 हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला.

या प्रकरणी दर्शन वाडकर (34), विशाल जोशी (31) दोघेही रा. धोंडखार, ता. रोहा आणि देवानंद मोकल (वय 36, रा. तळेखार, ता. मुरुड) या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version