| मुंबई | प्रतिनिधी |
पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्यावतीने महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाकडून तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट दैनंदिनी, दिनदर्शिका आणि पब्लिक सर्व्हिस अॅडव्हर्टाइजमेंट पुरस्काराने महापारेषणचा गौरव करण्यात आला. मंगळूर येथे आयोजित 18व्या जागतिक संवाद परिषदेत कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. कृष्णा भट यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महापारेषणचे संचालक (मनुष्यबळ विकास) सुगत गमरे, जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी जनसंपर्क विभागाचे अभिनंदन केले.