। पुणे | वृत्तसंस्था।
मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच पुण्यात तीन जणांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिजखाली अंडा भुर्जीचा स्टॉल आहे. जवळच्या नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने अंडा भुर्जीच्या स्टॉलवर काम करणारे अभिषेक अजय घाणेकर (25), आकाश विनायक माने (21) आणि शिवा जिदबहादुर परिहार (18) हे तिघे अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले. त्याचवेळी त्यांना विजेचा धक्का लागला. ही घटना आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.
शॉक लागून तिघांचा मृत्यू
