अलिबाग पोलिसांची कौतुकास्पद कारवाई
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कुरुळ आदिवासी वाडी येथून रविवारी रात्री तीन वर्षीय बालकाचे अपहरण केल्यानंतर त्या मुलाला अलिबाग पोलिसांनी शीतफिने शोध घेत अवघ्या काही तासातच आपल्या मातेच्या स्वाधीन केले.
मधुकर नारायण पारधी वय 22 रा भोमोली, पोयनाड असे या अपहरणकर्त्याचे नाव आहे. त्याने रविवारी कुरुळ आदिवासी वाडी येथून भावासोबत घराबाहेर खेळत असलेल्या संदेश नाईक याला खाऊ देतो सागून नेला सदर मुलाचे अपहरण केले. याबाबतची तक्रार अलिबाग पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय जाधव, सहायक उपनिरीक्षक प्रतीक पाटील, सहायक उपनिरीक्षक सुनील फड, पोलिस शिपाई शशिकांत सुतार, अतुल महीद आदींनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. खंडाळे तसेच भोमोली येथे त्याचा शोध घेतलं त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पेण असाने, दिवाण माळ येथून मधुकर पारधी याला ताब्यात घेवून बालकाची सुटका करीत मातेच्या स्वाधीन केले.