टायगर ग्रुप शिरूर तर्फे दुर्घटनाग्रस्तांना आर्थिक व जीवनावश्यक वस्तूची मदत

महाड | प्रतिनिधी |

टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव ,उपाध्यक्ष भैय्या साहेब बंडगर ,टायगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष उमेशभाऊ पोखरकर यांच्या मार्गदर्शनानुसार , महाड तालुक्यातील तलीये येथील ३० घरांवर दरड कोसळल्याने ८४ लोक त्यात दगावले .त्यांच्या दुःखात सहभागी होत तेथील दुर्घटनाग्रस्तांना टायगर ग्रुप शिरूर अध्यक्ष गोविंदभाऊ मिडगुले यांच्या कडून ३० हजार रुपयांची तसेच जीवनावश्यक वस्तुची मदत. तलीये येथील दुर्घटनाग्रस्त मंगेश शिरावले, सुनील शिरावले,विजय पांडे,निलेश कोंडाळकर, प्रदीप कोंडाळकर, किशोर कोंडाळकर यांच्याकडे मदत सुपूर्त केली.

Exit mobile version