पो.नि. संदिप कहाळे यांचे आवाहन
| म्हसळा | वृत्तसंस्था |
शासनस्तरावर संवेदनशील नोंद असलेल्या म्हसळा तालुक्यात सर्वधर्मिय नागरीक गुण्यागोविंदाने राहातात. असे असले तरीही आगामी काळात साजरे होणारे सण-उत्सव भयमुक्त,आनंदी आणि उत्साही वातावरण साजरे व्हावेत. कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी म्हसळा पोलिस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक सचिन कहाळे यांनी तालुका शांतता समिती सदस्यांची सभा आयोजित केली होती. सभेला मार्गदर्शन करताना पो. नी. कहाळे यांनी कधी तरी छोट्या छोट्या घटने वरून मोठ्या घटना घडतात त्या घडु नयेत यासाठी पोलिस दक्षता घेतील.
गुन्हा करणारा हा गुन्हेगार असतो त्याला जातधर्म नसतो अशा घटनाना जातीय रंग न लावता घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हेगारावर भारतीय न्याय संहिता नुसार कडक कारवाई केली जाईल मात्र हे करीत असताना गंभीर गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. नागरिकांनी आपल्या गावात, शहरात ज्या घटना घडतील त्या पोलिसांच्या निदर्शनात आणून दिल्यात तर वेळीच करवाई करता येईल आणि गुन्हा टाळता येईल. पोलिसांचे नाक, कान, डोळे हि जनताच आहे.आपल्या तालुक्यात शांतता सुविधा आणि तालुका गुन्हेगार मुक्त राहण्यासाठी दक्ष नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन स.पोलिस निरीक्षक सचिन कहाळे यांनी येणाऱ्या सणासुदीच्या पूर्वसंध्येला आयोजीत शांतता समिती सभेत मनोगत व्यक्त करताना सांगितले.
यावेळी सपोनि कहाळे यांनी पोलिसांचे ब्रीद वाक्याचे स्पष्टीकरण देताना खळ प्रवूतीच्या लोकांना कायद्याने सजा होईल असे काम करू हे करताना सर्वसामान्यांवर अन्याय होत असेल तर त्यांचे आम्ही संरक्षण करू असे उपस्थित शांतता प्रिय नागरीकांना संबोधित करताना सांगितले. कहाळे यांनी कायदा आणि सुव्यवस्थे बाबत सकारत्मक भुमिका स्पष्ट केल्याने म्हसळा तालुका शांतता समिती सदस्यांनी त्यांचे भूमिकेचे कौतुक केले आहे.
सभेला उपस्थित सदस्यांनी म्हसळा नगरातील ट्रॅफिक जॅम समस्या सोडवणुकी बरोबरच, गांजा, ड्रग नशामुक्ति, मटका जुगार अड्डे कायम स्वरुपी बंद करण्याची मागणी केली. शांतता समिती सभेला नगराध्यक्ष संजय कर्णिक, हिंदु समाज अध्यक्ष समीर बनकर, मुस्लीम समाज सचिव सलिम उकये, माजी सभापती महादेव पाटील, हिंदु समाज उपाध्यक्ष संतोष पाटील, निकेश कोकचा, प्रवीण उर्फ बाबु बनकर, समीर कालोखे, सुहेब हळदे, सुनिल उमरोटकर आदींनी चर्चेत भाग घेतला.
सभेला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल रोहिनकर, पो.कॉ.संतोष चव्हाण,समिती अध्यक्ष नंदु शिर्के,संजय खांबेटे,सुरेश कुडेकर, मुब्बशीर जमादार,तुकाराम पाटील, अनिल बसवत, भालचंद्र करडे, सुहेब घराडे, महेश पवार, बाबु शिर्के, निलेश मांदाडकर, सौरभ गोरेगावकर, दीपल शिर्के, संतोष उद्धरकर, अमित महामुनकर, नरेंद्र पदरथ आदी मान्यवर समिती सदस्य उपस्थित होते.