। तळा । प्रतिनिधी ।
घोणसे घाटाच्या पायथ्याशी ग्रामपंचायत घोणसे अंतर्गत वसलेल्या सात वाड्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुमारे 1 कोटी 89 लाख मंजुरी खर्चाचे नळपाणी योजनेचा भूमिपूजन आणि ग्रामपंचायत कार्यालय इमारत – 10 लक्ष, व अंगणवाडी इमारत – 8.50 लक्ष या दोन इमारतींचे उद्घाटन खासदार सुनिल तटकरे यांचे हस्ते संपन्न झाले.
यावेळी तटकरे यांनी पाण्याची समस्या संपली आणि पाणी भरताना होणारा त्रास कमी झाला की महिला वर्ग आपोआपच वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळतील त्यामुळे महिला बचत गटांना प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी बचतगट भवन इमारत बांधून वेगवेगळ्या स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण केले जाईल अशी ग्वाही दिली.
सरपंच रेशमा कानसे, समीर बनकर, महेश शिर्के, बबन मनवे, छाया म्हात्रे, संदीप चाचले, सुनिल महाडिक, सोनल घोले, घोणसे सरपंच रेश्मा कानसे, शगुप्ता जहांगीर, वृषाली घोसाळकर, मीना टिंगरे, फैसल गीते, प्रियांका निंबरे, वैदही लाड, राजू लाड, संतोष सावंत, अनिल बसवत, महेश घोले, पक्षाचे पदाधिकारी व घोणसे सात वाड्यांचे अध्यक्ष, पंचक्रोशीतील महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.