। म्हसळा । वार्ताहर ।
मार्च 2022 मध्ये झालेल्या दहावी आणि बारावी परीक्षेत तालुक्यातून प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या म्हसळा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार अंजुमन -ई -इस्लाम शिक्षण संस्था मुरुड यांच्या विद्यमाने म्हसळा येथील घनसार कोम्प्लेक्स मधील सभागृहात संपन्न झाला.
संस्थेचे अध्यक्ष अहमद हुसैन इरफान शहा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सत्कार समारंभास हलका कमिटीचे चेअरमन फजल हळदे, स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन नासिर मिठागरे, नगराध्यक्ष असल कादिरी, उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे, समीर इस्माईल उकये, भाई दफेदार, मुस्लिम समाज अध्यक्ष नाजीम चोगले, शकूर घनसार, अशफाक खमकर, संस्थेचे सचिव हिबजूरहमान नजिरी, डॉ. शेख अ. अजीज काजी, मुसदिक इनामदार, प्राचार्य मोहंमद तांबे, बशीर उलडे, साजिद हुरजूक, डॉ. मुबशीर जमादार, मुरुड विद्यालयाचे प्राचार्य गोठेकर, मतीन फणसे, शौकत घरटकर आदि मान्यवर उपस्थित होते.
सालाबादप्रमाणे अंजुमन संस्थातर्फे तालुक्यातील दहावी, बारावी मध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना गुच्छ, प्रमाणपत्र आणि स्मृती चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येते. या वेळी अनेक मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाळेतील शिक्षक आणि प्रचार्याना खर्या अर्थाने धन्यवाद दिले. प्राचार्य मोहंमद तांबे यांच्या कन्येला कर्नाटक मध्ये 99% गुण मिळाल्याने अंजुमन संस्थेतर्फे तिचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच रहमान घराडे यांनी सूत्रसंचालन केले.