| चौल | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या 79 व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या प्रारंभी शेकापच्या जिल्हा आघाडी प्रमुख शिवानी जंगम यांनी उपस्थित मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि राज्यभरातून आलेल्या बहाद्दर कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
यावेळी त्या म्हणाल्या, “आजचा दिवस खालापूरसाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचा आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या 79 व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्याची जबाबदारी खालापूरच्या कार्यकर्त्यांवर सोपविल्याबद्दल पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. या व्यासपीठावर उभे राहून आपल्या सर्वांचे स्वागत करण्याची संधी मिळणे हा माझा वैयक्तिक सन्मान नसून खालापूर तालुक्यातील प्रत्येक महिला कार्यकर्तीचा सन्मान आहे.”
पुढे त्या म्हणाल्या, “खालापूरच्या भूमीत आलेल्या प्रत्येक मान्यवरांचे, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि लाल बावट्याशी निष्ठा जपणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे त्यांनी मनःपूर्वक स्वागत करते. आजचा वर्धापन दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून नव्या ऊर्जेने, नव्या संकल्पाने आणि नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याचा दिवस आहे.” शेवटी त्यांनी “जय शेतकरी, जय महाराष्ट्र, जय शेकाप, लाल बावट्याचा विजय असो!” अशा घोषणांनी आपल्या स्वागतपर भाषणाची सांगता केली.
आजचा दिवस खालापूरसाठी ऐतिहासिक: शिवानी जंगम
