आज ‘प्रहार’चा अपंग मार्ग दर्शन मेळावा

| पोलादपूर | प्रतिनिधी |
महाड व पोलादपूर तालुक्यातील अपंगांना मार्गदर्शन करण्यासाठी आ. बच्चू कडूंच्या प्रहार अपंग क्रांती संस्थेतर्फे कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये मेळावा आ. भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती संघटनेचे महाड व पोलादपूर तालुकाध्यक्ष फैज उमर हुर्जूक यांनी दिली.

याप्रसंगी महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, पोलादपूर तहसीलदार दीप्ती देसाई, मुख्याधिकारी कोमल कराळे, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यरेखा पाटील व पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर आदींसह नगराध्यक्षा सोनल गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, पाणीपुरवठा सभापती प्रसाद इंगवले, नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण सभापती अस्मिता पवार, विरोधी गटनेते दिलीप भागवत, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी माजी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, माजी पं.स.सभापती शैलेश सलागरे तसेच प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाड व पोलादपूर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version