2731 कोटींंचा टोल आंदोलनामुळे बुडाला

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्र सरकारने आणलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांचं तब्बल एक वर्षाहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तब्बल 2731.31 कोटी रुपयांच्या टोलचा तोटा सहन करावा लागला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्‍नाच्या उत्तरात ही माहिती दिली.राज्यसभेत उत्तर देताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये टोलवसुली प्रभावित झाली आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये आंदोलकांनी पंजाबमधील टोलनाके बंद करण्यास सुरुवात केली, ज्याचा परिणाम हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागांमध्येही दिसून आला. शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील 60 ते 65 टोलनाक्यांवर परिणाम झाला.

Exit mobile version