उद्या उरणमध्ये जयंत पाटील यांची तोफ धडाडणार

| उरण | वार्ताहर |

महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि.15) डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक मराठी शाळेचे मैदान, उरण येथे सायंकाळी 6 ते 10 या वेळेत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांची तोफ धडाडणार आहे.

उरण विधानसभेचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. अनेक मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. त्यांना गावागावातून, शहरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. उरण शहराचा विकास हवा असेल तर प्रीतम म्हात्रे यांना निवडून देणे गरजेचे आहे. प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून अनेक पक्षातून, भाजपातून शेतकरी कामगार पक्षात पक्ष प्रवेश केला जात आहे. त्यामुळे भाजपाला खिंडार पडले आहे. येथील आमदाराने कोणतीही विकासाची कामे न केल्याने उरणचा मतदार, नागरिक उपेक्षित राहिला आहे. त्यामुळे प्रीतम म्हात्रे यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version