अलिबाग, नागाव, उसरोली गावांमध्ये घुसले पाणी
। रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार उडविला आहे. अलिबाग शहरात पावसाच्या पाण्याने अलिबाग एसटी स्टँड, तळकर नगर , श्रीबाग , अलिबाग बायपास , रामनाथ परिसरात पावसाचे पाणी घुसले आहे.
नागाव मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. कुंट्यांची गोटी गावातून पुराचे पाणी शिरले. मुरुड तालुक्यातील उसरोली आणि खैरवाडी येथे रस्ता पाण्याखाली गेला आहे. रोहा तालुक्यात एका फार्महाऊस मध्ये पर्यटक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे
