किल्ले रायगडावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू

महाड | विशेष प्रतिनिधी |

किल्ले रायगडावर पायरी मार्गाने जात असताना एका ५१ वर्षीय पर्यटकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. निळकंठ विरधवन (वय ५१, रा. पनवेल ) असे त्‍यांचे नाव आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली.

पनवेल परिसरातील काही पर्यटक शनिवारी दुपारी पायरी मार्गाने किल्ले रायगडवर जात होते. त्यांच्यामध्ये निळकंठ विरधवन देखील होते. रायगडाच्या महादरवाजापासून काही अंतरावर असतानाच निळकंठ यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते कोसळले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी आणले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी महाड तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे

Exit mobile version