मार्गदर्शक नसल्याने पर्यटक नाराज

| मुरूड | प्रतिनिधी |

जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येत आसतात. गेली दोन वर्षांपासून कोरोना काळात हा किल्ला पाहण्यासाठी बंदी होती, त्यावेळी किल्ल्यातील अंतर्भागातील माहिती देणारे स्थानिक गाइड हे पर्यटकांकडून वाट्टेल ते पैसे घ्यायचे वृत्त प्रसिद्ध होताच शासनाने हे मार्गदर्शकावर बंदी घातली होती. कोरोना काळानंतर पुन्हा जंजिरा किल्ला पाहण्यासाठी खुल्ला करण्यात आला. परंतु किल्ला पाहण्यासाठी येणारे पर्यटक ज्यावेळी किल्यात प्रवेश करतात त्यावेळी आत किल्याची माहिती देणारे मार्गदर्शक नसल्याने पर्यटकांना माहिती शिवाय परत जावे लागत आहे.

जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पुरातत्व विभागाकडून प्रवेश कर आकारला जातो. लाखों पर्यटकांचा करोडो रुपयांचा कर शासनाला मिळत आहे. तरीही पुरातत्व विभागाकडून या किल्याची माहिती मिळत नाही. तरी किल्ल्यावर शासनाने अधिकृत मार्गदर्शक नेमावे व त्यांना अधीकृत माहिती कर आकारणी करावी नाहीतर किल्यावर मार्गदर्शक फलक लावण्यात यावे अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.

किल्ल्यातील इतिहास कळत नसल्याने माहिती शिवाय परत जावे लागते आहे. या ठिकाणी माहिती फलक व मार्गदर्शक फलक लावावे नाहीतर अधिकृत मार्गदर्शक नेमावा.

श्रीकांत फुटाणे
पर्यटक पाथर्डी, अहमदनगर


या किल्ल्याला बाहेरून पाहण्याची व्यवस्था करावी जेणेकरून किल्ला बाहेरून सुद्धा पाहता येईल आतील माहिती मिळत नाही जर शासन प्रवेश कर आकारणी करत आहे तरी किल्याची माहिती मिळण्याची व्यवस्था करावी.

मनोज वाघ
पर्यटक कल्याण
Exit mobile version