| नवी दिल्ली | वृत्तसंस्था ।
टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते. ऑटोमेकरने याबाबत माहिती दिली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष होते. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे.
तसेच, विक्रम एस किर्लोस्कर यांच्या पार्थिवावर बुधवारी बेंगळुरू येथील हेब्बल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.