| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल, तळोजा, नवी मुंबई, उरण परिसरामध्ये वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे. अनेक वाहन चालक रोडवरच वाहने उभी करून वाहतूककोंडीत भर टाकत आहेत. तळोजा सेक्टर 9 मध्ये (एमएच-01-बीआर-1560) हा टेम्पो रोडवरच उभा केला होता. तळोजा पोलिस स्टेशन पथकाच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी संबंधित टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.