| नागोठणे | प्रतिनिधी |
सध्या जिल्ह्यात धुक्याची चादर पसरली आहे. त्यातच वातावरणात बदल होऊन गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे वातावरण बदलामुळे पहाटेच्या वेळेस मुंबई- गोवा महामार्गावर दाट धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दाट धुक्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील समोरील काहीच दिसत नसल्यामुळे बऱ्याचशा वाहन चालकांनी पहाटेच्या सुमारास वाहने रस्त्याच्या बाजुला किंवा कुठे पार्किंग दिसेल तिथे उभी करत धुकं कमी होण्याची वाट पाहण्याची वेळ वाहन चालकांवर आली आहे.
दाट धुक्यामुळे वाहतुकीस अडथळा
