कर्जत चारफाटा येथे वाहतूक कोंडी

पर्यटकांची गर्दी वाढली
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुका पर्यटन तालुका म्हणून विकसित झाला असून या तालुक्यातील फार्म हाऊसेस आणि रिसॉर्ट मध्ये विकेंडला गर्दी जमते. त्यात नाताळ नंतर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी असंख्य पर्यटकांची पावले कर्जतकडे वळली आहेत. त्या पर्यटकांच्या वाहनांमुळे कर्जत तालुक्यातील रस्ते गजबजले आहेत.
नाताळ सणापासून कर्जत या फार्म हाऊसेसच्या तालुक्यात पर्यटकांची गर्दी वाढू लागते आणि नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर पर्यटक आपल्या गावी परत जाण्यासाठी प्रवास सुरु करतात. यावर्षी नवीन वर्षे शनिवारी येत असल्याने त्यादिवशी आणि नंतर रविवार येत असल्याने रविवार दि.2 जानेवारी पर्यंत कर्जत तालुका गजबजलेला राहणार आहे. कर्जत तालुक्यात प्रवेश करण्यासाठी चौक भागातून एकमेव मार्ग चारफाटा येथे येत असल्याने त्या भागाला शनिवार पासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहेत.

प्रशासनाची तंबी
नवीन वर्षे साजरा करण्यासाठी येणारे पर्यटक यांच्यामुळे कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रोन येऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. त्यात शासनाने रात्री नऊ पासून सकाळी नऊ पर्यंतच्या सर्व कार्यक्रमांवर लावलेले निर्बध लक्षात घेऊन कर्जत तालुका प्रशासन देखील सतर्क झाले आहे. रिसॉर्ट मध्ये रात्रीचे कार्यक्रम आयोजित करण्यावर बंधने आणली असून तेथे येणारी प्रत्येक पर्यटकांचे दोन डोस झाले नसतील तर प्रवेश देऊ नये असे आदेश सर्व रिसॉर्ट मालक यांना बजावले आहेत.

Exit mobile version