मच्छीमार्केटजवळ वाहतूक कोंडी

Exif_JPEG_420

नागरिकांना कधी दिलासा मिळणार?
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड जंजिरा नगरपरिषदेमार्फत लाखो रुपये खर्च करून स्वच्छ व सुंदर मच्छीमार्केट मच्छीविक्रीकरिता उभं केलं आहे. मात्र, काही मच्छीविक्रिते रस्त्यात मच्छीविक्री करत असल्यामुळे सामान्य नागरिकांना व पर्यटकांना वाहतुकीचा फटका बसत आहे.जंजिरा किल्लात जाण्याकरिता हाच रस्ता असल्याने या रस्त्यावरून सर्व पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी ऐ-जा करित असतात.

मात्र या रस्त्यावर वाहतुकीमुळे तासन तास गाडीचा मार्ग काढण्यासाठी वेळ जात असल्याने त्यात एकमेकावर गाड्या समोर आल्याने शाब्दिक चकमक होऊन भांडणे होत आहे. तरी या रस्त्यावरील वाहतूक कशी सुरळीत राहील याची खबरदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी सर्वंचस्थांरावर होत आहे.

Exit mobile version