। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अलिबाग-पेण मार्गावरील पोयनाड भागात ऐन दिवाळीत शनिवारी (दि.2) सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यातून मार्ग काढताना प्रवाशांची तारांबल उडाली असल्याचे चित्र पहावयला मिळत आहे. रविवारी (दि.3) भाऊबीज असल्याने मोठ्या प्रमाणात चाकरमानी तसेच पर्यटक अलिबागच्या दिशेने येत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.