वाहनचालक हैराण
| पनवेल | वार्ताहर |
मुंबई – पुणे दृतगती महामार्गावर चिखले येथील पुलाचे गर्डर बसवण्याचे काम हाती घेण्यात आल्याने बुधवारी ( दि.10) दृतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक तीन तास बंद ठेवण्यात आली होती. या काळात वाहतूक अन्य मार्गांवरून वळवण्यात आल्याने दृतगती मार्गाचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्या कळंबोली सर्कल या ठिकाणी वाहनाची गर्दी होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मुबंई – पुणे दृतगती महामार्गांवरील चिखले येथे रेल्वेचा उड्डाणं पूल असून, या ठिकाणी गर्डर टाकण्याचे काम बुधवारी पूर्ण करण्यात आल्या नंतर महामार्गांवरू पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरु करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली. कामा दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये या करता वाहतूक विभागाच्या अधिकार्यानी आणि कर्मचार्यांनी विशेष प्रयत्न केल्याने ऐन उन्हाळ्याच्या काळात वाहतूक विभागाच्या कर्मचारी आणि अधिकार्यांची चांगलीच दमछाक झाली होती.