। कोलाड । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्याला वादळी वार्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अतिवृष्टीमुळे बुधवारी (दि.13) कुडली गावच्या हद्दीत कोलाड-भीरा वडाचे झाड पडुन वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेची माहिती कोलाड पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक सुभाष जाधव यांनी सहकार्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जेसीबीच्या सहाय्याने झाड बाजूला करुन बंद झालेली वाहतुक पुन्हा सुरळित केली आहे.
गेले काही दिवस वादळी वार्यासह सतत पडणार्या मुसळधार पावसाने रोहा तालुक्याला झोडपून काढले आहे. पावसाने अनेक ठिकाणी झाडे पडत आहेत तर नद्याच्या पाणी पातळीत देखील वाढ होत आहे. त्यामुळे रायगड़ात जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला असून प्रशासन सतर्क आहे.