सुकेळी खिंडीत ट्रेलरचा अपघात

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

। सुकेळी । वार्ताहर ।

मुंबई-गोवा महामार्गावर सध्या अपघातांची मालिका सुरू असतानाच महामार्गावरील अपघातग्रस्त खिंड अशी ओळख असलेल्या सुकेळी खिंडीमध्ये ट्रेलरचा अपघात झाला. सोमवारी (दि.21) मुंबई बाजूकडून कोलाड बाजूकडे जाणाऱ्या ट्रेलरचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला. ही घटना पहाटे 5.35 वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून कोलाडकडे जाणारा ट्रेलर सुकेळी खिंडीमधील खांब हद्दीमध्ये आल्यानंतर ट्रेलरचालक राजु सिंग रावत याचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी सरळ जाऊन डाव्या बाजूला उभ्या असलेल्या सिमेंटच्या काॅलमला जाऊन धडकला. हा अपघात सोमवारी (दि.21) पहाटेच्या सुमारास घडला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच वाकण टॅबच्या सहायक पोलीस निरीक्षक गितांजली जगताप यांच्यासह त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रेलर बाजूला करुन वाहतूक सुरळीत चालू केली. या अपघाताचा पुढील तपास कोलाड पोलीस करीत आहेत.

Exit mobile version