ट्रेलर व दुचाकीचा अपघात

| पनवेल | प्रतिनिधी |

मुंब्रा-पनवेल महामार्गावर घडलेल्या एका विचित्र अपघातात दुचाकी ट्रेलरखाली अडकल्याने महमार्गांवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या वेळी दुचाकी स्वाराणे चपळता दाखवत वेळीच गाडीवरून उडी घेतल्याने दुचाकी स्वराचा जीव वाचला असून, दुचाकीचे मात्र नुकसान झाले आहे.

खांदा वसाहतीत राहणारा रमेश शिंदे हा तरुण दुचाकीने कामावर जायला निघाला असताना आसूड गाव येथील पेट्रोल पंपावरून तो रास्ता पार करण्याचा प्रयत्न करत होता. याच वेळी पंपातून बाहेर पडणारा ट्रेलर चालक देखील रस्ता पार करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, यावेळी रस्त्यावर उभा असलेला दुचाकी चालक ट्रेलर चालकाला दिसला नाही. अपघाता नंतर बराच वेळ दुचाकी ट्रेलरच्या मागील चाकात अडकून पडली होती. घटणा स्थळी पोहचलेल्या पोलिसांनी बऱ्याच प्रयत्ना नंतर चाकाखाली अडकून पडलेली दुचाकी ट्रेलर खालून बाहेर काढली.

Exit mobile version