निजामपूर-विळे रस्त्यावर ट्रेलरची इनोव्हाला धडक; एक जखमी

। माणगाव । सलीम शेख ।
माणगावपासून जवळ असलेल्या निजामपूर-विळे रस्त्यावर ट्रेलरची इनोव्हा कारला धडक लागून झालेल्या अपघातात एक महिला जखमी झाली. सदरील अपघात गुरुवार दि. ९ मार्च रोजी सकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास विळे गावच्या हद्दीत घडला. या अपघाताच्या गुन्ह्याची माहिती फिर्याद प्रभाकर सुदाम मानकर (वय- ४६) रा. उतेखोल ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, या अपघाताच्या गुन्ह्याची फिर्याद देणारे प्रभाकर सुदाम मानकर हे त्यांच्या ताब्यातील इनोव्हा कार क्र. एम.एच. ०६/बी. एम.१२०८ या गाडीने कुटुंबाला घेऊन मुंबईला जात असताना गुरुवार दि. ९ मार्च रोजी सकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी विळे गावच्या हद्दीत आली असता कोलाड बाजूकडून येणारा ट्रेलर क्र. एम.एच. ४६/बी.यु.३६७२ या गाडीची इनोव्हा कारला उजव्या बाजूला धडक दिल्याने सदरचा अपघात घडला. या अपघातात फिर्यादी यांची पत्नी प्राजक्ता प्रभाकर मानकर यांना दुखापत होऊन त्या जखमी होऊन दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले.

या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गु.रजि.नं.६३/२०२३भादवि संहिता कलम २७९, ३३७ मोटार वाहन कायदा कलम अधी. १८४ प्रमाणे करण्यात येऊन ट्रेलर चालक आरोपी इनायतुल्ला अब्दुल हकीम (वय-२३) रा. गोपालपूर-उत्तरप्रदेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. लहांगे हे करीत आहेत.

Exit mobile version