भरधाव ट्रेलरची दुचाकीस्वाराला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार, चालक फरार

कोलाड | प्रतिनिधी |

मुबंई गोवा महामार्गाला जोडला गेलेला कोलाड सुतारवाडी महामार्गावर 27 सप्टेंबर रोजी अत्यन्त धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली असून भरधाव ट्रेलरने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सुतारवाडी येथील ढोकलेवाडी नजीक घडली आहे मालवाहू ट्रक ट्रेलर चा चालक फरार झाल्याने सदर घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे.

याबाबत कोलाड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 27 सप्टेंबर रोजी सायं. च्या सुमारास कोलाडकडून सुतारवाडीकडे भरधाव जाणारा ट्रेलर क्रमांक एम एच 048 ए जी 5370 तर सुतारवाडी कडून येणारी दुचाकी वाहन क्रमांक एम एच 06 ए व्ही 2539 चालक मंगेश प्रकाश हिलम रा. निळज माणगाव वय (20) सुतारवाडी कडून कोलाडच्या दिशेने येत असतांना ढोकळेवाडी येथील वळणावर ट्रेलर चालकाने दुचाकीस्वार मंगेश हिलम यांच्या दुचाकीला थेट जोरदार धडक दिल्याने या दुर्घटनेत मंगेश हिलम यांचा दुर्दैवी अंत झाला असून मालवाहू ट्रेलर चालक हा पसार झाला असल्याने याबाबत एकच संतप्त व्यक्त केला जात आहे.

सदरच्या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली असून कोलाड पोस्टे गुरनं 0077/2021 भादवी कलम 304 ए 279,337,338,मोटार वाहन अधिनियम 1988,184,134 प्रमाणे या घटनेची नोंद केली असून पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शखाली पोहवा जे.एस.चेरकर व एस.आर. माने अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version