मुंबई पोर्ट संघटनेतर्फे प्रशिक्षण वर्ग

| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील चार असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजरच्या जागेसाठी 25 कर्मचार्‍यांनी अर्ज केले आहेत. या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनतर्फे माझगाव येथील कामगार सदन सभागृहामध्ये ज्येष्ठ कामगार नेते एस. के. शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले होते.

या प्रशिक्षण वर्गात ए. बी. झरकर, सिद्धसंजय आफळे, ए. बी. इथापे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणवर्गाच्या समारोप प्रसंगी युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे, सेक्रेटरी विद्याधर राणे, विजय रणदिवे, प्रसिध्दीप्रमुख मारुती विश्‍वासराव, संघटक चिटणीस मनीष पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना मगदर्षणपर शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी खजिनदार विकास नलावडे, संघटक चिटणीस, बाळकृष्ण लोहोटे, उपाध्यक्ष निसार युनूस उपस्थित होते. प्रशिक्षणार्थीच्या वतीने मुनाफ पठाण यांनी आभार व्यक्त केले, तर प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी दिलीप बारगुडे यांनी सहकार्य केले.

Exit mobile version