सूक्ष्म खाद्य प्रक्रियेचे प्रशिक्षण

| चिपळूण । वार्ताहर ।
शरदचंद्रजी पवार अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेच्या क्षमता बांधणी अंतर्गत लाभार्थी वर्गवारी 1 चे प्रशिक्षण दि. 17 जुलै रोजी यशस्वीरित्या संपन्न झाले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुनंदा कुर्‍हाडे व प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी उपस्थित राहुन प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.प्रशिक्षणाच्या सांगता समारंभाला उर्मिला चिखले, शेखर विचारे, वैशाली लहाने, उमेश बिडये, सचिन निलख, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विक्रांत साळवी व आभारप्रदर्शन प्राध्यापिका रिया सकपाळ यांनी केले.

Exit mobile version