| उरण | वार्ताहर |
नागरी संरक्षणदल उरण, उरण तालुका मराठीपत्रकार संघ, नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल उरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागरी संरक्षण दलाच्या पांच दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.बाबासो काळेल यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन डॉ.बाबासो कालेल यांच्या हस्ते श्रीगणेशाच्या प्रतिमेला तर डॉ सत्त्या ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प घालून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.त्यावेळी त्यांच्या समवेत नागरी संरक्षण दलाचे सा.उपनियंत्रक एम.के.म्हात्रे, सा.उपनियंत्रक श्री. शीरसाठ, विलास पाटील, जेष्ठपत्रकार तथा सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापक प्रदीप पाटील, साप्ताहिक प्रांजलचे संपादक घनश्याम काडू स्कूलच्या दोन्ही विभागाच्या प्रिन्सिपॉल ज्योती म्हात्रे मॅडम,व इशिका मॅडम आदि मान्यवर आणि मोठया संख्येने प्रशिक्षणार्थी व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.