| अलिबाग | प्रतिनिधी |
डॉ.पारनेरकर महाराज विद्यालय वाशिवली येथे मंगळवारी (दि. 9) अलिबाग वाहतूक सुरक्षा विभाग व रसायनी वाहतूक सुरक्षा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा, पालकांना हेल्मेट सक्ती, दररोज होणारे सायबर गुन्हे व व्यसनाधीनता याबाबत माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी केले. अलिबाग वाहतूक विभागाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वाहतूक गुन्ह्यांबद्दल, हेल्मेटच्या वापराबाबत तसेच सायबर गुन्हे व सजगता या विषयावर सखोल माहिती दिली. यावेळी रसायनी वाहतूक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नामदेव डोके व वाहतूक पोलीस अधिकारी निलेश गडाख व शिक्षक- शिक्षिका उपस्थित होते. या सर्व अधिकाऱ्यांचे आभार डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील यांनी केले.







