। मुंबई । प्रतिनिधी ।
टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडियाने धमाकेदार ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये तुम्ही ट्रेनच्या भाड्यात विमानाने प्रवास करू शकता. एअर इंडियाने यासाठी खास विक्री सुरू केली आहे, जी काही दिवसांसाठीच आहे. ही विक्री 20 ऑगस्टला संपेल. एअर इंडियाच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपद्वारे तिकीट बुक करण्यासाठी कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही.