। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
लंडनमधील संपत्ती खरेदी प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सध्या जामीनावर असलेले रॉबर्ट वाड्रा हे आहेत. तर रॉबर्ट वाड्रा यांनी जामीन अर्जाच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप ईडीने केला आहे. आता या प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने र् वाड्रा यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी जामीन अर्जाच्या नियमांचा भंग केल्याचा दावा करत मंजूर केलेल्या अटकपूर्व जामिनाला आव्हान दिले आहे.