। रसायनी । प्रतिनिधी ।
साईकृपा हॉटेलसमोर कर्नाळा खिंड मुंबई- गोवा महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर बस पलटी झाल्याने रविवारी दुपारी भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात बस मधील प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दि. ३ साईकृपा हॉटेलसमोर कर्नाळा खिंड मुंबई- गोवा महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर बस पलटी झाली. या अपघातात रुद्र म्हात्रे (8), रवींद्र माने (37), प्रियांका माने (30), विना माने (56), नागेश कुणाल (60), रूपा कोलारे (44), जीत माने (34), सदाशिव सोमने (42), सीता माने (55) आणि स्नेहा माने हे सर्व बस मधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पळस्पे- कर्नाळा खिंड येथून 24 तास सेवा देणारी मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या या सेवेमार्फत जखमीस तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. या रुग्णवाहिकेद्वारे नानासाहेब धर्माधिकारी हॉस्पिटल, पनवेल येथे जखमींना दाखल करण्यात आले.
रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या विनामूल्य ॲम्ब्युलन्स सेवेतून आतापर्यंत 32840 अपघातग्रस्तांना वेळीच मदत करून त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहेत. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रायगड मधील अँम्ब्युलन्स कर्नाळा खिंड, विठ्ल कामत हॉटेल जवळ महामार्गावरील अपघात ग्रस्तांच्या सेवेसाठी विनामूल्य तैनात करण्यात आली आहे. तरी आपण सर्वांनी महामार्गावरील अपघात ग्रस्तांच्या विनामूल्य सेवेसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा. 8888263030 /8329425908 असे आवाहन करण्यात आले आहे.
पळस्पे- कर्नाळा खिंड महामार्गावर ट्रॅव्हलर बसला अपघात
