झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल शहरातील खांदा वसाहत येथील सेक्टर 9 परिसरात रस्त्यावरील पथदिवे झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमुळे झाकोळले गेले आहेत. त्यामुळे दिव्यांचा प्रकाश थेट रस्त्यावर पडण्यास अडथळा निर्माण होत आहे. संध्याकाळनंतर या भागात अंधाराचे प्रमाण वाढत असून नागरिकांना फूटपाथ व रस्त्यावरून चालताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्यावर मोठया प्रमाणावर वाहन पार्किंग केलेल्या असतात. विशेषतः महिला व तरुणींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अंधारामुळे चोरी, छेडछाड यांसारख्या प्रकारांना वाव मिळू शकतो, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. मात्र या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तातडीने झाडांची छाटणी करून पथदिव्यांचा प्रकाश सुरळीत करवा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

Exit mobile version