वरसे केंद्रातर्फे वृक्षारोपण

। खांब । वार्ताहर ।

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वरसे केंद्रातर्फे वृक्षारोपणाचा सोहळा रविवारी (दि.23) निवी-रोहा येथील डोंगराळ भागात शंभर वृक्षांच्या रोपांची लागवड करून संपन्न करण्यात आला. या उपक्रमात वरसे येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सुमारे 40 सेवेकरी मंडळींनी आपला सहभाग नोंदविला होता. तसेच, लागवड करण्यात आलेली झाडे दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करून जगविण्याचा संकल्प ही त्यांनी यावेळी केला. या सामाजिक उपक्रमात ग्रामसेवक दिपक चिपळूणकर तसेच दिपिका चिपळुणकर यांचे विशेष सहकार्य लाभले. दरम्यान, श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळींनी राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version