ग्रीन अलिबागच्या वतीने दत्त टेकडीवर वृक्षारोपण

। अलिबाग । प्रतिनिधी ।

ग्रीन अलिबाग या संस्थेच्या वतीने दत्त टेकडी कुरुळ येथे विविध औषधी वनस्पती व निसर्गाला उपयुक्त अशा वृक्षांची लागवड करण्यात आली. ग्रीन अलिबाग ही संस्था फेसबुकच्या माध्यमातून निर्माण झाली असून विविध क्षेत्रात व्यवसाय, उद्योग करणारे, शिक्षण घेणारे महाविद्यालयीन विद्यार्थी एकत्र येऊन करणात आली आहे. हा ग्रुप प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आला असून 70 सदस्य या ग्रुपमध्ये आहेत. या संस्थेमार्फत रविवारी दत्त टेकडी कुरूळ येथे वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या सर्व सदस्यांनी दत्त टेकडी कुरूळ येथे सकाळी सात वाजता उपस्थित राहून वड, पिंपळ, अशोक, सुरू, उबर , करंज, जांभूळ, सिताफळ अशा विविध निसर्गाला उपयुक्त व औषधी वृक्षाची लागवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे सदस्य प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार वृक्ष लागवड करण्यात आली.त्यानंतर सर्व सदस्यांची दत्तमदिर येथे बैठक होऊन पुढील कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात आली. प्रशांत पाटील यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.

Exit mobile version