विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
उलवे येथे रविवारी (दि.19) पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. सिद्धिविनायक मंदिर उलवे येथे श्री गणेशाचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमास गव्हाण ग्रामपंचायत सरपंच माई भोईर, सदस्य हेमंत पाटील, पनवेल तालुका भातगिरणी उपाध्यक्ष राजेंद्र घरत आदी मान्यवर आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या कार्यक्रमाची सुरुवात विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते विभागातील आरक्षित असलेल्या गार्डन प्लॉटवर वृक्षारोपण करुन करण्यात आली.


यावेळी मार्गदर्शन करताना प्रितम म्हात्रे यांनी सांगितले कि, उलवे विभागांमध्ये कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारचे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष उलवे नोड आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था भक्कमपणे नागरिकांच्या सोबत असेल. प्रत्येक नागरिकाने झाड न लावता लावलेले झाड हे जर दत्तक घेतले आणि त्याचा आपल्या परिवारातील सदस्याप्रमाणे सांभाळ करुन त्याची वाढ केली तर त्यामधून जो सुखद अनुभव मिळतो, तो कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही.
या कार्यक्रमाचे नियोजन सचिन राजे येरुणकर यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट सेक्टर 17 उलवे, अध्यक्ष नामदेव साळवी, जेष्ठ समाजसेवक सुरेश फाटक, प्रवीण झिंगे, मंगेश सावंत, निलेश पाटील, गणेश कदम, अमित जस्वाल, विनोद थोरात, नलवाडे, प्रकाश सुर्वे, विलास चांदेल, रचना येरुणकर, कीर्ती फटाक, झिंगे, कार्तिकी कदम आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version