। रेवदंडा । प्रतिनिधी ।
नेहरु युवा केंद्र संघटन, रायगड-अलिबाग आणि ओएसीस : बहुउद्देशीय समाजाभिमुख संस्था, रेवदंडा-अलिबाग-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने मांडला ग्रामपरिसरात भारताचे दिवंगत माजी मंत्री डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 121 व्या जयंतीचे निमित्त साधून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी पर्व तसेच राज्यात साजरा होत असलेला वनमहोत्सव यांचे संयुक्तिक औचित्य साधून स्थानिक युवा आणि किशोरवयीन सहभागातून वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मांडलाचे उपसरपंच राजेश पाटील, सदस्य धर्मेंद्र गायकवाड, सदस्य गीता नागोटकर, माजी सरपंच साक्षी गायकवाड, पंचायत कर्मचारी संतोष मोरे, नेहरु युवा केंद्र संघटन, रायगड-अलिबागच्या राष्ट्रीय युवा स्वयंसेवक मुरुड गट अक्षता सोडेकर, ओएसिस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक कोळी, कार्याध्यक्ष यज्ञेश पाटील, खजिनदार मानसी खातू, सहखजिनदार सार्थक गायकवाड, समन्वयक प्रगती कासार, विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे प्रमुख दर्श नागोटकर हे मान्यवर उपस्थित होते.
माजी सरपंच साक्षी गायकवाड, संतोष मोरे यांनी सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यात युवा वर्गाची गरज स्पष्ट करत संस्थेच्या कामाचे कौतुक केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या रंजना राय, सुमोघ घाग, आचल गायकवाड आदी स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली.