श्रीकृष्ण नावले यांना आदिवासी मित्र पुरस्कार

। गोवे -कोलाड । वार्ताहर ।
आदिवासी लोकांच्या उत्कर्षासाठी उल्लेखनीय कार्य करणार्‍या आधिकारी वर्गाचा सन्मान व्हावा म्हणून जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गोरेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांना आदिवासी मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गोरेगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबरोबर कोरोना काळात.आदिवासी,वंचित,गरीब,गरजू समाजाला मदत करणे,आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे टिकवून ठेवण्यासाठी मदत करणे, उच्च शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन करणे,रंजल्या गांजल्यांची खाकी वर्दीतही त्यांच्यातील माणूसपण ओळखून सेवा करणे अशा सर्व बाबींचा विचार करून सदरचा हा आदिवासी मित्र पुरस्कार रा.जि.प.सदस्य दयाराम पवार,वासंती वाघमारे, संघटनेचे अध्यक्ष भिवा पवार ,उमेश जाधव ,राजन पाटील ,नथुराम वाघमारे दत्ता पवार,संतोष वाघमारे, नामदेव हिलम,बबन कोळी, देऊ हिलम, राम कोळी, सुदाम जाधव, संजय कोळी, संजय काटकर, केशव वाघमारे,बाळकृष्ण काप या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Exit mobile version