| माथेरान | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील महादू फिरकड, प्रकाश पवार, शरद ठोंबरे, विष्णू खैर यांनी चला खेळूया एकतेसाठी या संकल्पनेतून आदिवासी रायगड प्रीमियर लिगची स्थापना केली. या लीगतर्फे बुधवारी ( 1 मार्च) चौक येथे प्रिमीअर लीग क्रिकेट स्पर्धा सुरु होणार आहेत.

आदिवासी रायगड प्रीमियर लिगच्या माध्यमातून रायगड मधील आदिवासी खेळाडूंचे हित लक्षात घेऊन ही स्पर्धा पार पडत आहे. या स्पर्धेत जवळपास रायगड जिल्ह्यातील नामांकित 400 आदिवासी खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. या स्पर्धेत 20 संघमालक असून ही स्पर्धा खालापूर तालुक्यातील चौक येथे होणार आहे. आदिवासी रायगड प्रीमियर लिगमध्ये प्रथम पारितोषक एक लाख, दुसरे पारितोषक पन्नास हजार, तिसरे पारितोषक पंचवीस हजार, चौथा पारितोषक पंचवीस हजार सह भव्य चषक असणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यातील सामनावीरास आकर्षक चषक असणार आहे.
या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांची आणि आदिवासी समाजातील नेत्यांची, सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभणार आहे. या स्पर्धेमध्ये खालापूर तालुक्यातील महादू पिरकड, शरद ठोंबरे, विष्णू खैर, प्रकाश पवार, रवी वाघमारे, रामदास वाघमारे, रवी वाघमारे, अशोक पवार, महेश कातकरी यांनी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले आहे.