संकेत कोतवाल यांना श्रद्धांजली

| चणेरा | प्रतिनिधी |

भातसई-रोहा येथील पोलीस पाटील संकेत कोतवाल (31) यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण पोलीस पाटील परिवारावर शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी रायगड जिल्हा पोलीस पाटील संघाच्यावतीने संकेत कोतवाल यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी वैयक्तिक तसेच संघटनेच्यावतीने कुटुंबीयांना रोख रक्कम 1 लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. या भेटीप्रसंगी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे कार्याध्यक्ष नरेश म्हात्रे पाटील, जिल्हाध्यक्ष विकास पाटील, मधुकर डायरे पाटील, कुणाल लोंढे पाटील, दिपक पावडे पाटील, गौतम लोखंडे पाटील, बळीराम गायकवाड पाटील, रविंद्र अहिरे पाटील, यशवंत पाटील, एकनाथ पाटील, शेखर तरे पाटील, मंगेश पाटील, श्रीधर घोडमोड पाटील, संतोष आंब्रे पाटील यांच्यासह रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य पोलीस पाटील उपस्थित होते.

Exit mobile version