। पनवेल । प्रतिनिधी ।
स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला हटकले असता या तरुणाने इतर दोघांच्या मदतीने विरोध करणाऱ्यास मारहाण करून त्याला जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नील भरत पुजारा असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो एमजी रोड, पनवेल येथे राहतो. नील हा ज्येष्ठ नागरिक हॉलजवळील चहाच्या टपरीवर चहा पिऊन दुचाकीने घरी जात असताना त्याची दुचाकी दर्गाजवळ आली असताना अज्ञात दुचाकी चालकाने तेथे स्टंटबाजी करत त्याच्या बाजूने गेला. त्यावर नील याने त्याला ‘अरे, तू मला उडवशील का?’ असा प्रश्न विचारला असता या रायडरने त्याला उलट उत्तर देत हा रायडर लोकांचा भाग आहे, तुला काय करायचे आहे, असे सांगत त्याच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर त्याने त्या ठिकाणी उभे असलेल्या. त्याच्या दोन साथीदारांसोबत नील याला ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत नील याच्या डोळ्यातून रक्त येऊ लागल्याने त्याला चक्कर आली व खोली बसला. त्यानंतर नील याला मारहाण करणारे तिघेजण तेथून निघून गेले. या घटनेनंतर नील याला लक्ष्मी आय केअर पनवेल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
स्टंटबाजीला विरोध करणाऱ्यास त्रिकुटाची मारहाण
